परब यांच्या कथित रिसॉर्टचा वाद उच्च न्यायालयात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परब यांच्या कथित रिसॉर्टचा वाद उच्च न्यायालयात
परब यांच्या कथित रिसॉर्टचा वाद उच्च न्यायालयात

परब यांच्या कथित रिसॉर्टचा वाद उच्च न्यायालयात

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालकीच्या दापोलीतील कथित रिसॉर्टचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात आला आहे. केंद्र सरकारने बजावलेल्या नोटिशीला रिसॉर्टमालकाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
केंद्रीय पर्यावरण विभागाने (एमओईएफसीसी) दापोलीतील साई रिसॉर्ट्स एनएक्स रिसॉर्टच्या मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून रिसॉर्टवर कारवाई का करू नये, अशी विचारणाही केली आहे. त्या नटॉशीविरोधात रिसॉर्टच्या मालकाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने याचिकेवर सोमवारी (ता. २६) सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. हे रिसॉर्ट आधी माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालकीचे असल्याचा दावा माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला होता. रिसॉर्टमालक सदानंद कदम यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २०१७ मध्ये माजी मंत्री आणि आमदार अनिल परब यांच्याकडून बंगला बांधण्यासाठी भूखंड खरेदी केला होता. जमिनीच्या नावात बदल करण्यात आल्याच्या महसूल नोंदी आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08960 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..