ठाणे खाडीखाली देशातील पहिला सागरी बोगदा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे खाडीखाली देशातील पहिला सागरी बोगदा!
ठाणे खाडीखाली देशातील पहिला सागरी बोगदा!

ठाणे खाडीखाली देशातील पहिला सागरी बोगदा!

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ : राज्यात सत्ताबदल होताच मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला गती आली आहे. बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानक बांधकामासाठी निविदा मागविण्यात आली आहे. आता नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने भारतातील पहिल्या सात किलोमीटर लांबीच्या पाण्याखालील बोगद्याच्या बांधकामाकरिता निविदाप्रक्रिया सुरू केली आहे. देशातील हा पहिलाच लांब सागरी बोगदा ठरणार असून तो ठाणे खाडीतून तयार करण्यात येणार आहे.

‘नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन’ने मुंबई-अहमदाबाद रेल कॉरिडॉर प्रकल्प हाती घेतला आहे. कॉर्पोरेशनने त्यासाठी टनेल बोरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत वापरून २१ किमी लांबीच्या बोगद्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत. हा बोगदा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा येथील भूमिगत स्थानकादरम्यान असेल. या दरम्यान ठाणे खाडीखाली सुमारे सात किमी लांबीचा समुद्राखालील बोगदा तयार करण्यात येणार आहे. तो देशातील पहिला सागरी बोगदा असणार आहे. तो सिंगल ट्युब पद्धतीचा असेल. ज्यामध्ये अप आणि डाऊन दोन्ही मार्गांसाठी टू विन ट्रॅक असतील. पॅकेजचा एक भाग म्हणून बोगद्याच्या आसपासच्या ३७ ठिकाणी ३९ उपकरणे ठेवण्यासाठी खोल्या देखीलही करण्यात येणार आहेत. या बोगद्याच्या बांधकामासाठी १३.१ मीटर व्यासाचे कटर हेड असलेले टीबीएम मशीन वापरले जाईल.

असे होईल काम
- सुमारे १६ किमीचा बोगदा करण्यासाठी तीन टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येणार आहेत. उर्वरित पाच किमी बोगद्याचे काम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीद्वारे केले जाईल.
- बोगदा जमिनीपासून सुमारे २५ ते ६५ मीटर खोल असेल. सर्वात खोल बांधकाम पॉईंट शिळफाटाजवळ असून पारसिक टेकडीपासून ११४ मीटर खाली असेल.
- बीकेसी (पॅकेज ‘सी १’अंतर्गत), विक्रोळी आणि घणसोलीजवळील सावली परिसरात अनुक्रमे ३६, ५६ आणि ३९ मीटरच्या अंदाजे खोलीवर तीन शाफ्ट बांधण्यात येणार आहेत.
- घणसोलीमध्ये ४२ मीटरचा झुकलेला शाफ्ट आणि शिळफाटा येथील पोर्टलमुळे एनएटीएम पद्धतीनुसार सुमारे पाच किमी बोगदा बांधणे सुलभ होणार आहे. ‘सी २’ पॅकेजसाठी १९ जानेवारी २०२३ पर्यंत निविदा सादर करता येणार आहेत.

९६ टक्के भू-संपादन पूर्ण
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्यातील ९६ टक्के भू-संपादन झाले आहे. बीकेसीतील भूमिगत स्थानक, बोगद्याची रचना आणि बांधकामासाठी यापूर्वीच निविदा मागविण्यात आल्या आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील जमीन हस्तांतरण रखडले होते. आता मात्र प्रकल्पाला वेग आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08977 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..