अकरावीची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावीची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर
अकरावीची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर

अकरावीची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची तिसरी गुणवत्ता यादी शुक्रवारी (ता. २३) जाहीर झाली. यात मुंबई महानगर क्षेत्रात अर्ज केलेल्या २६ हजार ७९७ पैकी १८ हजार ९० जणांना प्रवेश मिळाले आहेत. उर्वरित ८ हजार ७०७ जागा अजूनही रिक्त राहिल्या आहेत.
रिक्त राहिलेल्या जागांमध्ये विद्यार्थ्यांकडून गुणवत्ता नसताना आपले पसंतीक्रम नोंदविले असल्याने त्यांना प्रवेश मिळू शकले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाला आणखी एक विशेष प्रवेश फेरी राबवावी लागेल, असे मत शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे; तर काही संस्थाचालक आणि प्रवेशासाठी अनागोंदी करणाऱ्या मंडळींकडून प्रवेशापासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या नावाखाली गैरमार्गाने प्रवेश करण्यासाठी प्रथम प्राधान्य फेरी सुरू करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच असंख्य विद्यार्थ्यांना गुण कमी असताना ठराविक महाविद्यालयांमधील पसंतीक्रम नोंदविण्यासाठी भाग पाडले जात आहे. त्यामुळे हेच विद्यार्थी त्याच महाविद्यालयांमध्ये गैरमार्गाने प्रवेश करतील. यामुळे शिक्षण विभागाने कोणत्याही स्थितीत प्रथम प्राधान्य ही बेकायदेशीर प्रवेश फेरी न राबवता चौथी विशेष फेरी राबवावी, अशी मागणी केली जात आहे.
--
शाखा एकूण जागा एकूण अर्ज अॅलॉटमेंट विद्यार्थी
कला १७८२६ २००६ १८०४
वाणिज्य ५११२९ १५६०१ १०९४७
विज्ञान २३४६८ ८७३२ ४९०६
एमसीव्हीसी २०११ ४५८ ४३३
एकूण ९४४३४ २६७९७ १८०९०
--

पसंतीक्रमानुसार मिळालेले प्रवेश
पसंतीक्रम कला वाणिज्य विज्ञान एचएसव्हीसी एकूण
पहिला १५७३ ६७३७ २९५१ ४१० ११६७१
दुसरा १३१ १४०५ ६३१ १७ २१८४
---

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08981 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..