नवरात्रौत्सवानिमित्त भाजपचा ‘मेगा इव्हेंट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रौत्सवानिमित्त भाजपचा ‘मेगा इव्हेंट’
नवरात्रौत्सवानिमित्त भाजपचा ‘मेगा इव्हेंट’

नवरात्रौत्सवानिमित्त भाजपचा ‘मेगा इव्हेंट’

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : सरकारने सर्व उत्सव निर्बंधमुक्त साजरे करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपतर्फे मुंबईत दहीहंडी आणि गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवाचाही जल्लोष करण्यात येणार आहे. भाजपच्या वतीने नवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध गीतकार, संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांच्यासह गायिका बेला शेंडे व गायक स्वप्नील बांदोडकर सुरांचा वर्षाव करणार आहेत. आमदार मिहीर कोटेचा यांनी भाजपच्या मेगा इव्हेंटची आज माहिती दिली.

नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांबाबत आज मुंबई भाजपतर्फे माहिती देण्यात आली. अवधूत गुप्ते, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, मुंबई महापालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे इत्यादींसह इतर मान्यवर पत्रकार परिषदेस उपस्थित होते. कोटेचा यांनी सांगितले, की दहीहंडी आणि गणेशोत्सवानंतर आता भाजपतर्फे नवरात्रोत्सवाचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. शिवडीच्या अभ्युदय नगरमधील शहीद भगतसिंह मैदानावर ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान उत्सव होणार आहे. शेवटच्या दोन दिवसांत सरकार १२ पर्यंत कार्यक्रमांना परवानगी देणार आहे. १ ऑक्टोबर रोजी वैशाली सामंत आणि त्यानंतर अनेक कलाकार उत्सवात हजेरी लावणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन अभिनेता पुष्कर श्रोती करणार आहे. प्रत्येक व्यक्तीला पास घेऊन प्रवेश मिळणार आहे. भाजपच्या कार्यक्रमासाठी जांबोरी मैदान, महालक्ष्मी रेसकोर्स आणि अभ्युदय नगर अशा तीन जागांचा विचार करण्यात आला होता. मात्र, अखेरीस अभ्युदयनगरचा पर्याय भाजपने निवडला.

मुंबईत दांडियाचा मोठा कार्यक्रम व्हावा, अशी सर्वांची इच्छा आहे. भाजपच्या उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असे भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या.
.......