तंत्रशिक्षण संचालनालयातील २६ जणांना नवरात्रेची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तंत्रशिक्षण संचालनालयातील २६ जणांना नवरात्रेची भेट
तंत्रशिक्षण संचालनालयातील २६ जणांना नवरात्रेची भेट

तंत्रशिक्षण संचालनालयातील २६ जणांना नवरात्रेची भेट

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक व प्रशासन सेवातील गट-ब मधील अधीक्षक आदी पदांवरील २६ अधिकाऱ्यांना १० वर्षांनंतर पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे ते आता प्रबंधक, सहायक संचालक, सहायक सचिव आदी पदांवर पोहोचले असल्याने ऐन नवरात्रोत्सवाच्या काळातच विभागाने मोठी भेट दिल्याची भावना निर्माण झाली आहे.
मुंबईसह राज्यातील पुणे, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, नागपूर, वाशीम आणि अहमदनगर आदी ठिकाणच्या शासकीय अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन आदी महाविद्यालयांत आणि विभागीय कार्यालयात अधीक्षक या पदांवर कार्यरत असलेल्या २६ जणांची पदोन्नती ही मागील २०१३ पासून रखडली होती; मात्र आता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेमुळे तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक अभय वाघ यांच्या पाठपुराव्यामुळे हा पदोन्नतीचा मार्ग खुला झाला असल्याने अधिकारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
...
पदोन्नतीची प्रकरणे ही गेल्या काही वर्षांपासून रखडली होती; परंतु आमची प्राथमिकता ही शैक्षणिक गुणवत्तेला आहे. चांगल्या अधिकाऱ्यांना संधी मिळाली पाहिजे, त्यामुळे त्यांच्या कामांचा, योगदानाचा एक वेगळा दर्जा विकसित होईल. त्यांना अधिक काही चांगले काम करता येईल. गुणवत्तेसाठी आम्ही २ हजार ७२ प्राध्यापकांची पदेही भरत आहोत. शिवाय एकाही महाविद्यालयांमध्ये प्राचार्यपद रिक्त राहणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार आहे.
- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री