एचबीटी आरोग्य केंद्र सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एचबीटी आरोग्य केंद्र सज्ज
एचबीटी आरोग्य केंद्र सज्ज

एचबीटी आरोग्य केंद्र सज्ज

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २९ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्राचे (एचबीटी) काम अंतिम टप्प्यात आले आहे. केंद्रासाठी आवश्यक डॉक्टर, परिचारिका, फार्मासिस्ट आणि अन्य कर्मचारी यांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. दोन ऑक्टोबरपासून केंद्र जनतेसाठी खुले होत असून पहिल्या टप्प्यात ५० एचबीटी केंद्रे सुरू होत आहेत. यामुळे झोपडपट्टी परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना घराजवळच दर्जेदार सुविधा मिळणार आहेत.
सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत केंद्र खुली राहणार आहेत. सकाळी ७ ते २ आणि दुपारी ३ ते ११ या दोन सत्रांत ही आरोग्य केंद्रे सुरू राहतील. या आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट आणि इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या केंद्रांवर १३९ प्रकारच्या चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या आरोग्य केंद्रात रुग्णांची नोंदणी केली जाणार आहे, असे महापालिका उपायुक्त संजय कुऱ्हाडे यांनी सांगितले. झोपडपट्टी परिसरात बहुतांश आरोग्य केंद्र सुरू होत असून पहिल्या टप्प्यात मुंबई शहर आणि उपनगरात ५० आरोग्य केंद्रे सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यातील ३४ जागी असलेल्या केंद्रांमध्ये तज्ज्ञांची सेवा घेता येणार आहे. केंद्रे दोन स्वरूपात चालवले जाणार असून त्यात काही ठिकाणी कंटेनरमध्ये, तर काही ठिकाणी पालिकेच्या आरोग्य दवाखान्यांत ही केंद्रे चालवण्यात येणार आहेत.
...
तत्काळ निदान होणे शक्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांना झोपडपट्टी भागात आरोग्य मोबाईल मेडिकल युनिट्सची संख्या वाढवण्याचे आणि कॅन्सर स्क्रीनिंग मॅमोग्राफीसाठी स्वतंत्र मोबाईल व्हॅन सुरू करण्याचे निर्देशही दिले आहेत. अशा प्रकारच्या सुविधा रुग्णांना पॉलिक्लिनिकमध्ये मिळणार असल्याचेही कुराडे यांनी सांगितले. आरोग्य केंद्रामध्ये आठवड्यातून एक दिवस गंभीर आजाराचे तज्ज्ञ डॉक्‍टर रुग्णांची तपासणी करणार आहेत. त्यामुळे तत्काळ निदान होणेदेखील या एचबीटी आरोग्य केंद्रामुळे शक्य होणार आहे.