डबेवाल्यांना दिवाळी बोनस द्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डबेवाल्यांना दिवाळी बोनस द्या!
डबेवाल्यांना दिवाळी बोनस द्या!

डबेवाल्यांना दिवाळी बोनस द्या!

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : घरोघरी वेळेत डबा पोचवण्याची मुंबईच्या डबेवाल्यांची परंपरा सव्वाशे वर्षांपासून अबाधित आहे. अविरत सेवा पुरवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांना ग्राहक स्वखुशीने बोनसही देतात. कोविडमुळे खंडित झालेली ही परंपरा पुन्हा सुरू व्हावी, याचा ग्राहकांनी विचार करावा, असे आवाहन करत डबेवाल्यांनाही बोनस द्यावा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.
कोरोनानंतर काही डबेवाले अपुरा रोजगार, कमी उत्पन्न असतानादेखील डबे पोहचवण्याचे काम चिकाटीने करत आहेत. आपल्याला सेवा देणाऱ्या डबेवाला कामगाराला या वर्षी दिवाळीला एक महिन्याचा अधिकचा पगार खुशीने बोनस म्हणून देण्यात यावा व खंडित झालेली परंपरा पुन्हा चालू करावी, अशी विनंती सुभाष तळेकर यांनी केली आहे.