दसरा मेळाव्यापूर्वी पोलिस आयुक्तांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दसरा मेळाव्यापूर्वी पोलिस आयुक्तांची भेट
दसरा मेळाव्यापूर्वी पोलिस आयुक्तांची भेट

दसरा मेळाव्यापूर्वी पोलिस आयुक्तांची भेट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : शिवसेनेच्या आगामी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिष्टमंडळाने मुंबईचे पोलिस आयुक्त शैलेश फणसळकर यांची भेट घेतली. शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांची भेट घेणाऱ्या या शिष्टमंडळात आमदार किरण पावसकर, समन्वयक सचिन जोशी, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. येत्या ५ ऑक्टोबरला शिवसेनेच्या वतीने वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी ही भेट घेण्यात आल्याचे शेवाळे यांनी सांगितले.