धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सल्लागाराची नेमणूक होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सल्लागाराची नेमणूक होणार
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सल्लागाराची नेमणूक होणार

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सल्लागाराची नेमणूक होणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी धारावी पुनर्वसन प्रकल्पाने (डीआरपी) हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. प्रकल्पाच्या कामात मदत करण्यासाठी डीआरपीने सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला असून यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

धारावी झोपडपट्टी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा मागविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिल्यानंतर गृहनिर्माण विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. यामध्ये प्रकल्पाला मदत करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार प्रकल्पाने धारावी प्रकल्पासाठी निविदा मागविण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मदत करण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्प २३ हजार कोटींचा असून या प्रकल्पाच्या किमतीच्या कमीत कमी टक्केवारीत काम करण्यास तयार होणाऱ्या कंपनीस हे काम देण्यात येणार आहे. त्यानुसार पात्र कंपन्यांना २० ऑक्टोबरपर्यंत निविदा भरता येणार आहेत.