देशमुखांच्या जामिनावर आज निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशमुखांच्या जामिनावर आज निकाल
देशमुखांच्या जामिनावर आज निकाल

देशमुखांच्या जामिनावर आज निकाल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालय निकाल देणार आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये देशमुख यांना ईडीने अटक केली होती. सीबीआय आणि ईडीने त्यांच्या विरोधात खंडणी वसुलीसह अनेक गंभीर आरोप ठेवले आहेत; मात्र केवळ राजकीय हेतूने माझ्यावर आरोप करण्यात आले असून, माझ्या विरुद्ध तपास यंत्रणेकडे कोणताही ठोस पुरावा नाही, असा दावा केला आहे. तर देशमुख यांनी पदाचा गैरवापर केला, असा आरोप ईडीने ठेवला आहे. वैद्यकीय कारणांसह, वाढते वय आणि आजार अशी कारणे देशमुख यांनी जामीन अर्जात दिली आहेत.