उंचीच्या मर्यादेमुळे अडचणीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उंचीच्या मर्यादेमुळे अडचणीत वाढ
उंचीच्या मर्यादेमुळे अडचणीत वाढ

उंचीच्या मर्यादेमुळे अडचणीत वाढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये अग्निशामक जवान म्हणून किमान १७२ सेंटीमीटर उंची असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अग्निशमन दलामध्ये नोकरी मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या अग्निशमन सेवा संचालनालयामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांची नोकरीबाबत अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे युवकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

राज्यभरातील महापालिकेमध्ये अग्निशमन दलामध्ये भरती होताना अग्निशामक जवानाची उंची १६५ सेंटीमीटर असावी, अशी अट आहे. तर सरकारी प्रशिक्षण केंद्रामध्येही १६५ सेंटीमीटरची अट आहे. राज्य सरकारच्या अखत्यारित अग्निशमन सेवा संचालनालयामध्ये अग्निशमक जवान व अधिकारी पदी भरती होण्यासाठी सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येते. संचालनालयामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या जवानाला भरतीच्या वेळी मुंबई अग्निशमन दलासह अन्या शहरातील अग्निशमन दलामध्ये प्राधान्य देण्यात येते.

मुंबई वगळता राज्यातील अन्य महानगर व शहरातील अग्निशमन दलामध्ये जवानांची भरती करताना १६५ मीटर उंचीची मर्यादा आहे. मुंबई महापालिका अग्निशमन दलामध्ये १७२ सेंटीमीटर उंचीची सक्ती करण्यात आल्याने मुंबई अग्निशमन दलात भरती होताना अडचणी येणार आहेत.
..........