बेस्टच्या ताफ्यात ११७ इलेक्ट्रिक वाहनांची भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेस्टच्या ताफ्यात ११७ इलेक्ट्रिक वाहनांची भर
बेस्टच्या ताफ्यात ११७ इलेक्ट्रिक वाहनांची भर

बेस्टच्या ताफ्यात ११७ इलेक्ट्रिक वाहनांची भर

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : बेस्ट उपक्रमाने अंतर्गत वाहतुकीसाठी डिझेलवर चालणाऱ्या मोटार वाहनांऐवजी विद्युत वाहने भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत एकूण ११७ इलेक्ट्रिक वाहने समाविष्ट करण्यात येणार असून, त्यापैकी ९६ वाहने तयार झाली आहेत. बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्या हस्ते आज १५ वाहनांचे उद्घाटन कुलाबा आगारात करण्यात आले. वाढते प्रदूषण आणि डीझेलवरील खर्च कमी करण्यासाठी बेस्टने आपल्या ताफ्यातील सर्व वाहने इलेक्ट्रिक करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हापासून बेस्टच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहने दाखल होत आहेत. यापूर्वी बेस्टच्या ताफ्यात ४०० इलेक्ट्रिक बस होत्या. या नवीन वाहनांमुळे बेस्टच्या वार्षिक खर्चातही २५ टक्के बचत होईल, असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.