मुंबईतील वातावरण ‘उत्तम’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील वातावरण ‘उत्तम’
मुंबईतील वातावरण ‘उत्तम’

मुंबईतील वातावरण ‘उत्तम’

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : मुंबईत सध्या ‘उत्तम’ हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद झाली आहे. सर्व भागांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक ५० च्या खाली नोंदवण्यात आला आहे. अपवाद फक्त बीकेसी परिसराचा असून तेथील हवा गुणवत्ता निर्देशांक इतर भागांपेक्षा अधिक म्हणजे ८४ नोंदवला गेला आहे.

पावसाळ्यात प्रदूषणाची पातळी खालावलेली असते. या ऋतूमध्ये बहुतांश उत्तम हवा मिळते. गेल्या १५ दिवसांमध्ये मुंबईत पावसाचा जोर कमी झाला आहे; परंतु अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने मुंबईतील हवेचे प्रदूषण वाढलेले नाही. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक ४२ असून ‘उत्तम’ नोंदवला गेला आहे. मुंबईत सर्वात कमी हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद भांडुपमध्ये २३ अशी झाली आहे. त्याखालोखाल कुलाबा २७, माझगाव २९, वरळी ३२, बोरिवली ४२, अंधेरी ४२ आणि चेंबूर ४७ असा हवामान निर्देशांक नोंदवला गेला आहे. मुंबईत केवळ बीकेसी परिसरामध्ये ८४ हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला आहे.

वाहनांचा ओघ वाढल्याने दर्जा घसरला
दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बीकेसी परिसराकडे येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली होती. बुधवारी मोटरसायकली आणि चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात पार्क केली गेली. वाहनांचा ओघ दोन दिवस कायम होता. त्यामुळे बीकेसी परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक वाढला असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विभाग हवा गुणवत्ता निर्देशांक
मुंबई शहर ४२
बीकेसी ८४
चेंबूर ४७
बोरिवली ४२
वरळी ३२
माझगाव २९
कुलाबा २७
भांडुप २४