चार महिन्यांत मेट्रो ४चे केवळ ५ टक्के काम पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार महिन्यांत मेट्रो ४चे केवळ ५ टक्के काम पूर्ण
चार महिन्यांत मेट्रो ४चे केवळ ५ टक्के काम पूर्ण

चार महिन्यांत मेट्रो ४चे केवळ ५ टक्के काम पूर्ण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ आणि कासारवडवली ते गायमुखदरम्यान मेट्रो ४ अ मार्गिकांचे एकूण ४१ टक्के काम पूर्ण झाले असून मागील चार महिन्यांत या मार्गांचे केवळ ५ टक्के पूर्ण झाले असल्याने या मेट्रो मार्गांच्या कामाला वेग येत नसल्याचे दिसत आहे. एमएमआरडीएने प्रकल्पाचे काम ४१ टक्के पूर्ण झाल्याची माहिती दिल्यावर ही बाब स्पष्ट झाली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेचे काम २०१८ पासून सुरू आहे. एमएमआरडीएने केलेल्या नियोजनानुसार हा प्रकल्प ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेला लॉकडाऊन आणि इतर कारणांनी या प्रकल्पाचे काम थंडावले होते; तर या मार्गिकेच्या पॅकेज ८, पॅकेज १० आणि पॅकेज १२ चे काम सुमारे आठ महिन्यांहून अधिक काळ बंद होते. सद्यस्थितीत या मार्गिकेच्या दोन पॅकेजची ५० टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली असून एकूण काम सुमारे ४१ टक्के पूर्ण झाले आहे. काम संथगतीने सुरू असल्याने या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास आणखी तीन वर्षे लागण्याची शक्यता आहे.
...
३२.३२ किलोमीटर लांब
मेट्रो ४ मार्गिका ३२.३२ किलोमीटर लांबीची असून त्यावर ३२ स्थानके असणार आहेत. तसेच या मार्गिकेचा गायमुखपर्यंत विस्तार करण्यात आला असून त्याला मेट्रो ४ अ नाव देण्यात आले आहे. ही मार्गिका २.६७ किमी लांबीची आहे. या दोन्ही मार्गिकेची एकूण लांबी ३५.२५ किलोमीटर आहे.
या दोन्ही मेट्रो मार्गांचे काम संथगतीने सुरू असून मे महिन्यात या मार्गांचे काम ३६ टक्के पूर्ण झाले होते. सप्टेंबरमध्ये या मार्गाचे काम ४१ टक्के झाले आहे. गेल्या चार महिन्यांत केवळ ५ टक्के काम झाल्याने हा प्रकल्प पूर्ण होण्यास बराच कालावधी लागणार असल्याची शक्यता आहे.