Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या जागेचा वाद मुंबई उच्च न्यायालयात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या जागेचा वाद मुंबई उच्च न्यायालयात
बुलेट ट्रेनच्या जागेचा वाद न्यायालयात

Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या जागेचा वाद मुंबई उच्च न्यायालयात

sakal_logo
By

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी विक्रोळी येथील गोदरेज उद्योग समूहाची सुमारे १० एकर जागा संपादित करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सुमारे २६४ कोटी रुपये जमा करण्याची परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला आहे; तर भरपाईची रक्कम वाढवून मिळण्यासाठी गोदरेज कंपनीने न्यायालयात याचिका केली आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी रेल्वे मंत्रालयाने एनएचएसआरसीएल ही उपकंपनी गुजरात आणि महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत नियुक्त केली आहे. समुद्राखालून एक बोगदा बांधायचा आहे, ज्यासाठी विक्रोळीमधील गोदरेज कंपनीची जागा संपादित केली आहे; मात्र ही जागा संपादित करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी झाला होता आणि त्यासंबंधीची भरपाई रक्कम देण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.

या चार वर्षांत अनेक बाबी घडल्यामुळे या भरपाईच्या रकमेवर फेरविचार करण्याची मागणी करणारी याचिका गोदरेज समूहाच्या वतीने करण्यात आली आहे.
न्या. नितीन जामदार आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी याचिकेवर सुनावणी झाली. राज्य सरकारने उपजिल्हाधिकाऱ्यामार्फत या जमिनीसाठी सुमारे २६४ कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यासाठी अर्ज केला आहे. तसेच भरपाईची रक्कम एका वर्षात जाहीर होत असली तरी त्यामध्ये वेळोवेळी अवधी मिळत असतो, असा युक्तिवाद सरकारकडून करण्यात आला.