पहिल्या एसआरएला विकसक मिळेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्या एसआरएला विकसक मिळेना
पहिल्या एसआरएला विकसक मिळेना

पहिल्या एसआरएला विकसक मिळेना

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : सांताक्रूझ पूर्वेकडील कोळे कल्याण येथील ओम नमो सुजलाम सुफलाम सोसायटीचा रखडलेला एसआरए पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याकडे विकसकांनी पुन्हा पाठ फिरवली आहे. तब्बल तीन वेळा निविदा भरण्याची संधी विकसकांना देण्यात आली; मात्र त्याकडे विकसकांनी पाठ फिरवल्याने अखेर निविदा अटी-शर्थींमध्ये बदल करून पुन्हा नव्याने निविदा मागवण्यात येणार आहेत.
सांताक्रूझ पूर्वेकडील कोळे कल्याण येथील ओम नमो सुजलाम सुफलाम सोसायटीचे रहिवासी आणि विकसक यांच्यामधील वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. यावर न्यायालयाने येथील झोपड्यांचा पुनर्विकास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत राबवून रहिवाशांना घरे देण्याचे निर्देश २०१८ मध्ये दिले होते. यानंतर ही योजना राबवण्यासाठी एसआरएने निविदा प्रक्रिया राबविली; मात्र त्याला विकसकांकडून प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे दोन वेळा निविदा प्रकियेला मुदतवाढ दिल्यावर एक विकसक पुढे आला, पण त्यानेही हा प्रकल्पात राबवण्यात स्वारस्य नसल्याचे पत्र दिले. मग एसआरएने पुन्हा निविदा मागवल्या. त्यानुसार विकासकांना १३ जुलैपर्यंत निविदा भरता येणार होती. या मुदतीमध्ये प्रतिसाद न लाभल्याने एसआरएने दोन वेळा मुदतवाढ दिली. यामध्येही प्रतिसाद न आल्याने अखेर पुन्हा नव्याने निविदा मागवण्याचा निर्णय एसआरएने घेतला आहे. त्यानुसार निविदा अटी-शर्थीमध्ये बदल करून लवकरच निविदा काढण्यात येतील, असे एसआरएच्या अधिकाऱ्याने सांगितले.