गिरणी कामगार आक्रमक होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गिरणी कामगार आक्रमक होणार
गिरणी कामगार आक्रमक होणार

गिरणी कामगार आक्रमक होणार

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : गिरणी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्व श्रमिक संघटनेच्या गिरणी कामगार विभागाच्या वतीने बुधवारी (ता. १२) आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला. या वेळी घरांसाठी विशाल मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला.
मोर्चात राज्यातील शेकडो कामगार सहभागी झाले होते. गिरणी कामगारांच्या घराचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी विभागवार जनजागृती मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. यानंतर गिरणी कामगारांच्या प्रश्नावर विशाल मोर्चा काढण्याचा निर्धार राज्यभरातून आलेल्या कामगारांनी केला आहे. राज्य सरकारने गिरणी कामगारांना बंद गिरण्यांच्या जमिनीवर घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बंद गिरण्यांच्या जमिनीवर म्हाडामार्फत घरे बांधण्यास सुरुवात झाली. काही कामगारांना घरे मिळाली असली, तरी सुमारे दीड लाखांहून कामगार अद्यापही घराच्या प्रतीक्षेत आहेत. पनवेल कोन येथील घरांची सोडत काढून त्यामधील पात्र कामगारांनी घराची संपूर्ण रक्कम भरली आहे. त्यानंतरही कामगारांना घराचा ताबा मिळालेला नाही. नवीन सोडत काढण्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून दीड लाख कामगारांना घरे देण्याबाबत धोरण जाहीर करावे, या मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुंबई-ठाण्यासह कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागातील शेकडो गिरणी कामगार व वारसदार सहभागी झाले होते.
...
आंदोलनात कामगारांच्या एकजुटीसाठी विभागवार मेळावे आयोजित करून विशाल मोर्चा काढण्यात येईल.
- कॉ. बी. के. आंबे, अध्यक्ष, सर्व श्रमिक संघटना