मुक्त विद्यालयाचा निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुक्त विद्यालयाचा निकाल जाहीर
मुक्त विद्यालयाचा निकाल जाहीर

मुक्त विद्यालयाचा निकाल जाहीर

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालयामार्फत ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वीच्या मूल्यमापनाचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यासाठीची माहिती आणि विषयनिहाय श्रेणी www.msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्याला श्रेणी आणि त्याच्या माहितीची प्रत संकेतस्थळावरून घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांना त्यांनी इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीपर्यंतची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र नंतरच्या काळात वितरित केले जाणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.