नायर रुग्णालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नायर रुग्णालय
नायर रुग्णालय

नायर रुग्णालय

sakal_logo
By

‘नायर’चा आरक्षित भूखंड
रिकामा करण्याचे आदेश
पालिकेच्या भूमिकेवर खंडपीठ नाराज

मुंबई, ता. १३ : नायर रुग्णालयाच्या विस्तारासाठी २५ वर्षांहून अधिक काळ आरक्षित ठेवलेला भूखंड रिकामा करून मुंबई महापालिकेला देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी बांधकाम व्यावसायिकाला दिले. महापालिका अधिकाऱ्यांनी लोकहिताचा विचार करण्याऐवजी बिल्डरच्या फायद्याचा विचार केला असे दिसते, असे ताशेरेही खंडपीठाने ओढले.
‘नायर’च्या परिसरात सुमारे १५५९ चौमी भूखंड रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीसाठी आरक्षित ठेवण्यात आला होता. सुमारे १५५९ चौमीचा हा भूखंड जनहितार्थ वापरण्यासाठी नायर रुग्णालयाला मंजूर करण्यात आली होती; मात्र मुंबई महापालिकेच्या वतीने जागा खाली करण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयानेही महापालिकेच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईसारख्या महानगरीत जागा उपलब्ध होणे किती महत्त्वाचे आहे. तिथे रुग्णालयाची जागा मिळवून देण्यात महापालिकेचा ढिसाळपणा दिसून येतो, असे निरीक्षण खंडपीठाने व्यक्त केले. संबंधित जागा एका महिन्यात रिकामी करून देण्याचे आदेश न्यायालयाने बिल्डरला दिले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते इमरान कुरेशी यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली होती. याचिकेत बांधकाम व्यावसायिक रबरवाला डेव्हलपर्स प्रा. लि., मुंबई महापालिका, राज्य सरकार आणि नायर रुग्णालयाला प्रतिवादी करण्यात आले आहे.