राज्यातील माता मृत्युदर घटवण्यासाठी प्रयत्नांची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील माता मृत्युदर घटवण्यासाठी प्रयत्नांची गरज
राज्यातील माता मृत्युदर घटवण्यासाठी प्रयत्नांची गरज

राज्यातील माता मृत्युदर घटवण्यासाठी प्रयत्नांची गरज

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : सर्वसाधारणपणे डॉक्टर एका वेळी एकाच रुग्णाला सेवा देत असतात; पण प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ एकावेळी दोन जीवांना आरोग्य व जीवन देण्याचे पुण्यकार्य करत असतात. देशातील माता मृत्युदर प्रतिलक्ष १०३ इतका असला तरीही महाराष्ट्रात तो ३८ इतका कमी आहे. राज्याची या क्षेत्रातील प्रगती उल्लेखनीय अशीच आहे. तरीही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील तज्ज्ञांनी हा दर आणखी कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत व त्या दृष्टीने शासनाला सूचना कराव्या, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.
महिला आरोग्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील निवडक प्रसूतितज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे गुरुवारी सत्कार करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. ‘द असोसिएशन ऑफ ऑबस्टेट्रिक अँड गायनाकॉलॉजिकल सोसायटीज या प्रसूतितज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञांच्या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने या वेळी ३७ तज्ज्ञ व डॉक्टरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
...
ग्रामीण भागात प्रसूतिपूर्व सेवा
राज्याच्या ग्रामीण भागात प्रसूतिपूर्व सेवा देणे आव्हानात्मक काम असून या दृष्टीने प्रसूतितज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञांची ‘अमॉग्स’ ही संघटना कार्य करत आहे, असे संस्थेच्या २०२०-२२ या काळातील अध्यक्ष डॉ. नंदिता पालशेतकर यांनी सांगितले. प्रसूती हा महिलेकरिता सुखद अनुभव असावा या दृष्टीने स्त्रियांचा आत्मसन्मान जपत प्रसूतिसेवा देण्याच्या दृष्टीने संघटना शासनाच्या सहकार्याने ‘लक्ष्य मान्यता’ हा उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सन २०२२-२४ या वर्षासाठी नवनियुक्त अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंह परदेशी व स्त्रीरोगतज्ज्ञ उपस्थित होते.