बनावट प्रमाणपत्र प्रकरणी डॉक्टर विद्यार्थ्याला दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट प्रमाणपत्र प्रकरणी डॉक्टर विद्यार्थ्याला दिलासा
बनावट प्रमाणपत्र प्रकरणी डॉक्टर विद्यार्थ्याला दिलासा

बनावट प्रमाणपत्र प्रकरणी डॉक्टर विद्यार्थ्याला दिलासा

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : दहा वर्षांपूर्वी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी बनावट जात प्रमाणपत्र सादर करणाऱ्या डॉक्टरचा पदव्युत्तर प्रवेश आणि पदवी जैसे थे ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत; मात्र सन २०१९ मध्ये त्याला सुनावण्यात आलेला ११ लाख रुपयांचा दंड कायम ठेवला.
याचिकादार विद्यार्थ्यांच्या प्रवेशामुळे एसटी (अनुसूचित जमाती) उमेदवाराची जागा गमावल्याचे म्हणता येणार नाही. नियमानुसार एखादा विद्यार्थी जरी राखीव प्रवर्गातून प्रवेश घेत असतो, तेव्हा त्या उमेदवाराला पात्रता परीक्षेत मिळालेले गुण खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यासाठी पुरेसे असतात. त्यामुळे त्याचा प्रवेश खुल्या प्रवर्गातून विचारात घ्यावा आणि राखीव प्रवर्गातील जागा अन्य पात्र उमेदवारासाठी राखून ठेवण्यात यावी, असे निर्देश न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. एन. लड्ढा यांच्या खंडपीठाने दिले. याचिकाकर्त्यांची पदवी काढून घेणे योग्य ठरणार नाही, असेही न्यायालयाने नोंदवले. याचिकाकर्ते के मोहम्मद यांनी २०१०-११ च्या वैद्यकीय पदवीसाठी अनुसूचित जमातीचे बनावट जात प्रमाणपत्र सादर करून प्रवेश मिळवला. पदवी मिळवल्यानंतर त्यांनी नीट पीजी २०१७ मार्फत नेत्रविज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेतला. केईएम महाविद्यालय व्यवस्थापनाने त्यांना ११ लाख रुपयांचा दंड जमा करण्याचे आदेश दिले. तसेच नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे त्यांची एमबीबीएस पदवी रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे पत्र लिहिले होते. याविरोधात खान यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.