शनिवारी विद्यापीठात य. दि. फडके व्याख्यानमाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शनिवारी विद्यापीठात य. दि. फडके व्याख्यानमाला
शनिवारी विद्यापीठात य. दि. फडके व्याख्यानमाला

शनिवारी विद्यापीठात य. दि. फडके व्याख्यानमाला

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : मुंबई विद्यापीठाच्या नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात डॉ. य. दि. फडके महाराष्ट्र व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी १५ ऑक्टोबरला दुपारी २ ते ४ या वेळेत ही व्याख्यानमाला होणार आहे. फिरोजशहा मेहता भवन येथील नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विभागाच्या व्हर्च्युअल क्लास रूममध्ये होणाऱ्या व्याख्यानमालेत ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा महाराष्ट्रविषयक विचार’ हा प्रमुख विषय असून त्यासाठी संस्कृत भाषा अभ्यासक आणि संशोधक हेमंत राजोपाध्ये आपले विचार मांडतील.