दिवसभरात कोरोनाचे १७९ नवे रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवसभरात कोरोनाचे १७९ नवे रुग्ण
दिवसभरात कोरोनाचे १७९ नवे रुग्ण

दिवसभरात कोरोनाचे १७९ नवे रुग्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : मुंबईत कोरोनाचा चढ-उतार सुरू असून गुरुवारी दिवसभरात १७९ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ५१ हजार ९५५ वर पोहोचली आहे. दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७३८ वर पोहोचली आहे. दिवसभरात ७९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख ३१ हजार १७० रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या १,०४७ सक्रिय रुग्ण आहेत.