वाचनाने माणूस संस्कारक्षम बनतो! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाचनाने माणूस संस्कारक्षम बनतो!
वाचनाने माणूस संस्कारक्षम बनतो!

वाचनाने माणूस संस्कारक्षम बनतो!

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : माणूस घडविण्याचे आणि संस्कारक्षम बनविण्याचे काम वाचनाने होते. त्यामुळे वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून ही वाचनाची सवय जोपासण्याचे काम होईल, अशी अपेक्षा विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयातील मराठी भाषा समितीने कार्यक्रमाचे विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्‍घाटन विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते झाले. विधिमंडळ सचिवालयाचे सहसचिव अनिल महाजन, प्रसिद्ध कवयित्री व लेखिका नीरजा आदींची या वेळी उपस्थिती होती. कवयित्री नीरजा यांनी ''सांस्कृतिक उभारणी आणि वाचन संस्कृती'' या विषयावर विचार मांडले. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे शुभ संदेश वाचून दाखविण्यात आले.