म्हाडाची सोडत लांबणीवर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडाची सोडत लांबणीवर?
म्हाडाची सोडत लांबणीवर?

म्हाडाची सोडत लांबणीवर?

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : म्हाडा मुंबई मंडळाची सुमारे चार हजार घरांची सोडत दिवाळीत काढण्याची घोषणा तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यानुसार सोडतीची प्रक्रिया अद्यावत करण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून यासाठी सॉफ्टवेअर अद्यावयत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे; मात्र मुंबईकरांना आणखी दोन महिने सोडतीची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सोडतीसाठी घरे उपलब्ध होऊ न शकल्याने म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत गेला काही वर्षे काढण्यात आली नाही. मुंबई मंडळाने हाती घेतलेले प्रकल्प अंतिम टप्यात पोहचले असल्याने मंडळाने दिवाळीमध्ये सोडत काढण्याची तयारी सुरू केली होती. दिवाळीमध्ये सोडत काढण्याची घोषणा तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यानुसार सोडतीच्या प्रक्रियेत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्याप्रमाणे सोडतीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात येत आहे. दिवाळीच्या तोंडावर सोडत काढण्याची तयारी मंडळाने केली होती. त्यामुळे मुंबईकरांची उत्सुकता वाढली; मात्र सोडतीच्या सॉफ्टवेअरचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने मुंबईकरांना सोडतीसाठी आणखी दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. सॉफ्टवेअर अद्यावयत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून सोडतीला आणखी दोन महिने लागतील, असे मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
...

येथे असणार घरे
मुंबई मंडळाच्या सोडतीमध्ये पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल, विक्रोळी कन्नमवार नगर आणि इतर विखुरलेल्या घरांचा समावेश असणार आहे.