‘धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करा’
‘धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करा’

‘धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करा’

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ : धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी यापूर्वी राबवलेल्या जागतिक निविदा प्रकियेकडे कंपन्यांनी पाठ फिरवली आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता असून हा प्रकल्प कोणताही विकसक राबवू शकणार नाही. त्यामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करून त्याऐवजी एसआरए प्रकल्प राबवावा, अशी रोखठोक भूमिका झोपडट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे आणि धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मलकुमार देशमुख यांनी येथे मांडली.
मुंबई महानगर प्रदेशच्या विकासाविषयी विस्तृत चर्चा करण्यासाठी मुंबई मेट्रोपोलिटन रिजन ॲक्ट २०३४ या विशेष परिषेदेचे आयोजन वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये शनिवारी (ता. १५) करण्यात आले होते. या परिषदेच्या झोपडपट्टीमुक्त मुंबई विषयावर आयोजित सत्रात ते बोलत होते. या सत्रात एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास हेही उपस्थित होते. देशमुख यांच्या मतावर श्रीनिवास यांनी धारावीमध्ये एसआरए प्रकल्प राबवणे अशक्य असल्याचे मत मांडत धारावी प्रकल्पाच्या कामाला प्रारंभ झाल्यास मुंबईचा झोपडपट्टीमुक्तीच्या दिशेने प्रवास सुरू होईल, असेही ते म्हणाले.