अमूल, मदर डेअरीचे दूध प्रतिलिटर २ रुपयांनी महाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमूल, मदर डेअरीचे दूध प्रतिलिटर २ रुपयांनी महाग
अमूल, मदर डेअरीचे दूध प्रतिलिटर २ रुपयांनी महाग

अमूल, मदर डेअरीचे दूध प्रतिलिटर २ रुपयांनी महाग

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : प्रमुख दूध पुरवठादार अमूल आणि मदर डेअरीने उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे फूल-क्रीम दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ केली आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने गुजरात वगळता सर्व बाजारपेठांमध्ये अमूल गोल्ड आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रत्येकी २ रुपयांनी वाढ केली आहे.
अमूलच्या निर्णयानंतर मदर डेअरीने १६ ऑक्टोबरपासून दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारतातील काही इतर बाजारपेठांमध्ये फूल-क्रीम दूध आणि गाईच्या दुधाच्या किमती प्रतिलिटर २ रुपयांनी वाढवण्याची घोषणा केली.
मदर डेअरीच्या फूल-क्रीमचे दर ६१ रुपयांवरून ६३ रुपये प्रतिलिटर, तर गाईच्या दुधाचे दर ५३ रुपयांवरून ५५ रुपये प्रतिलिटर करण्यात आले आहेत. या वर्षातील ही तिसरी वाढ असून यामुळे घरगुती बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मार्च आणि ऑगस्टमध्येही सर्व प्रकारांसाठी दर २ रुपये प्रतिलिटरने वाढवण्यात आले होते.
कच्च्या दुधाच्या खरेदी खर्चात झालेल्या वाढीमुळे दुधाच्या किमती वाढल्या आहेत. जनावरांचा चारा महाग झाल्याने दूध उत्पादक/शेतकऱ्यांनी कच्च्या दुधाचे दर वाढवले आहेत. फॅटच्या किमतीत वाढ झाल्यामुळे अमूल गोल्ड आणि म्हशीच्या दुधाच्या किमती २ रुपयांनी वाढवण्यात आल्याचे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे स्पष्ट केले आहे.
दुग्ध उद्योगाला कच्च्या दुधाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे, जी गेल्या दोन महिन्यांत प्रतिकिलो ३ रुपयांनी वाढली आहे. चाऱ्याच्या वाढलेल्या किमती आणि काही उत्तरेकडील राज्यांमध्ये कमी पाऊस यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि ग्राहकांना दर्जेदार दूध उपलब्ध करण्यासाठी ही भाववाढ केल्याचे मदर डेअरीकडून सांगण्यात आले आहे.
...
मुंबईत अमूल दुधाचा खप हा साधारणतः १० ते १५ लाख लिटर आहे. आरे दुधाचा पुरवठा बंद होत आल्याने बाहेर राज्यातील दुधाचा खप वाढताना दिसत आहे. परिणामी त्यांनी किमतीही वाढवल्या आहेत. यातून आपल्या दुग्ध व्यवसायिक आणि सहकारी संस्थांनी सावध होण्याची गरज आहे. याकडे वेळीच लक्ष नाही दिले, तर परराज्यातील दूध कंपन्या आपल्याकडील दुधाची बाजारपेठ काबीज करण्याचा धोका आहे.
- राम कदम, समन्वयक, आरे दुग्धशाला बचाव संघर्ष समिती