एक लाख शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक लाख शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला मदत
एक लाख शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला मदत

एक लाख शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला मदत

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ : पॅराशूट कल्पवृक्ष फाऊंडेशनतर्फे देशातील एक लाख शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यानुसार सन २०२६ पर्यंत या शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. या मोहिमेत शेतकऱ्यांना शेतीच्या आधुनिक पद्धती वापरण्यासाठी सज्ज केले जाईल. त्यासाठी आतापर्यंत देशात २४ हजारांहूनही जास्त प्रशिक्षण शिबिरेही घेण्यात आली आहेत. कौशल्यविकास, प्रशिक्षण व नवकल्पना यांच्या साह्याने समाजाची प्रगती करण्याचा कंपनीचा निर्धार आहे, असे मॅरिकोचे अमित भसीन म्हणाले. २०१७ पासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत अडीच लाख एकर जमीन असलेल्या ६२,९०० शेतकऱ्यांना जोडण्यात आले आहे. त्याद्वारे त्यांचे उत्पन्न दरवर्षी पंधरा टक्के वाढले आहे.