‘एल अँड टी’ला ओरिसामध्ये लिफ्ट इरिगेशनचे काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एल अँड टी’ला ओरिसामध्ये लिफ्ट इरिगेशनचे काम
‘एल अँड टी’ला ओरिसामध्ये लिफ्ट इरिगेशनचे काम

‘एल अँड टी’ला ओरिसामध्ये लिफ्ट इरिगेशनचे काम

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ : एल अँड टी कन्स्ट्रक्शन विभागाच्या पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया व्यवसायाला ओडिशा सरकारच्या जलस्रोत विभागाकडून मेगालिफ्ट इरिगेशन प्रकल्पाची दोन कंत्राटे मिळाली आहेत. या कामांचे मूल्य एक हजार कोटी ते अडीच हजार कोटी रुपये आहे. या कामाअंतर्गत २३ लिफ्ट इरिगेशन योजनांची उभारणी करावी लागेल. आनंदापूर लेफ्ट मेन कॅनॉल, बिद्याधरपूर बराज, हदगड जलाशय, आनंदापूर बराज आदी कामे यात आहेत. खारसुआ, कानी आणि बैताराणी नद्यांच्या प्रदेशातील ही कामे आहेत. यामुळे किओंझर, जयपूर, केंद्रापाडा जिल्ह्यातील सुमारे तीस हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल.