मराठा क्रांती मोर्चाचे रमेश केरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suicide attempt Ramesh Kere of Maratha Kranti Morcha
मराठा क्रांती मोर्चाचे रमेश केरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

मराठा क्रांती मोर्चाचे रमेश केरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे-पाटील यांनी रविवारी (ता. १६) आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जे.जे. रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. केरे यांनी फेसबुकवर लाईव्ह प्रक्षेपण करून आत्महत्येचा प्रयत्न केला. लाईव्ह प्रक्षेपणात केरे म्हणाले, ‘माझ्या समाजाचे नुकसान होईल, असे कोणतेही पाऊल मी उचलले नाही. समाजासाठी माझे कार्य सुरू होते. त्यातून मराठा समाजाला न्याय मिळेल, असा उद्देश ठेवला होता. मात्र, माझी बदनामी होत असून ते मला सहन होत नाही.

समाजाच्या कार्यात मी गेल्या २० वर्षांपासून कार्यरत असून माझी नाहक बदनामी केली जात आहे. अशा बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत. शिवाय राज्यातील सर्व समन्वयकांची चौकशी व्हावी, अशी मागणी केरे-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा फुटावा, यासाठी केरे-पाटील यांनी पैसे घेतले असल्याचा आरोप एका ऑडिओमधून करण्यात आला होता. मात्र, या ऑडिओ क्लिपशी माझा संबंध जोडू नये. या क्लिपमुळे झालेल्या बदनामीमुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आपण विषप्राशन केले असल्याचे फेसबुक प्रक्षेपणातून केरे यांनी सांगितले.