राज ठाकरेंचे पत्र हा स्क्रिप्टचा भाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज ठाकरेंचे पत्र हा स्क्रिप्टचा भाग
राज ठाकरेंचे पत्र हा स्क्रिप्टचा भाग

राज ठाकरेंचे पत्र हा स्क्रिप्टचा भाग

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रावरून उमेदवार मागे घेणे हा स्क्रिप्टचाच एक भाग आहे, भाजपला पराभव दिसू लागला होता, असा टोला आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. जामीन सुनावणीसाठी न्यायालयात आले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
भाजपने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उभे केलेले उमेदवार मुरजी पटेल यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाकरे यांच्या आवाहनावर हा निर्णय घेतला, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. याबाबत आज न्यायालयात आलेल्या राऊत यांनीदेखील प्रतिक्रिया व्यक्त केली. ठाकरे यांचे पत्र हे स्क्रिप्ट असून निवडणुकीत पराभव होणार हे भाजपला कळून चुकले आहे. त्यांनी या मतदारसंघात सर्वेक्षण केले होते. लटके तब्बल ४५ हजार मतांनी निवडून येणार असल्यामुळे पराभव बघून भाजपने माघार घेतली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
...
मंगळवारपर्यंत न्यायालयीन कोठडी
दरम्यान, ईडीने राऊत यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंह यांनी आज युक्तिवाद पूर्ण केला. राऊत यांनी सर्व आरोपांचे खंडन केले असून राजकीय हेतूने अटक केली आहे, असा दावा केला आहे. मंगळवारी यावर पुढील सुनावणी होणार असून तोपर्यंत न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे.