५६ वर्षीय महिलेकडून तिघांना अवयवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

५६ वर्षीय महिलेकडून 
तिघांना अवयवदान
५६ वर्षीय महिलेकडून तिघांना अवयवदान

५६ वर्षीय महिलेकडून तिघांना अवयवदान

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : मुंबईतील एका ५६ वर्षीय महिलेकडून करण्यात आलेल्या अवयवदानामुळे तिघांना जीवनदान मिळाले. रविवारी (ता. १६) करण्यात आलेले मुंबईतील हे या वर्षातील ३१ वे अवयवदान ठरले. दरम्यान, या महिलेचे दोन्ही मूत्रपिंड तसेच यकृत दान करण्यात आल्याने तिघांना जीवनदान मिळाले. ५६ वर्षीय महिलेची प्रकृती खालावल्याने तिला परळच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारांदरम्यान तिला मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यानंतर समुपदेशन केल्यानंतर नातेवाईकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संबंधित महिलेचे दोन्ही मूत्रपिंड तसेच यकृत दान करण्यात आले. या अवयवदानामुळे तीन रुग्णांना जीवदान मिळाले आहे.