दापोलीच्या रिसॉर्टला नोटीस बजावण्याचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दापोलीच्या रिसॉर्टला नोटीस बजावण्याचे आदेश
दापोलीच्या रिसॉर्टला नोटीस बजावण्याचे आदेश

दापोलीच्या रिसॉर्टला नोटीस बजावण्याचे आदेश

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : दापोलीमधील वादग्रस्त रिसॉर्टवर कारवाई करण्यापूर्वी रिसॉर्ट मालकांना रीतसर नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज स्थानिक प्रशासनाला दिले.
शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या मालकीचे संबंधित साई रिसॉर्ट असल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. रिसॉर्टच्या बांधकामात नियमांचे उल्लंघन झाले असून त्यावर पाडकाम करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे; मात्र हा राजकीय वैमनस्याचा प्रकार असून माझी बाजू ऐकून घेतली जात नाही, असा दावा करणारी याचिका मालक सदानंद कदम यांनी केली आहे. सोमवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. सर्व प्रतिवादींना चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मूळ तक्रारदार सोमय्या यांनीदेखील याचिकेवर बाजू मांडण्यासाठी अर्ज केला आहे. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला आहे. यावर पुढील सुनावणी २४ नोव्हेंबरला होणार आहे.
...
उच्च न्यायालयात याचिका
केंद्रीय पर्यावरण विभागाने दापोलीतील साई रिसॉर्ट एनएक्सच्या मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच पर्यावरणाचे नुकसान होत आहे, असा ठपका ठेवून रुपये २५ लाख दंडही सुनावण्यात आला आहे. या नोटिशीविरोधात या रिसॉर्टचे मालक कदम यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.