सोमय्यांची शैक्षणिक माहिती विद्यापीठाकडे सापडेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोमय्यांची शैक्षणिक माहिती विद्यापीठाकडे सापडेना
सोमय्यांची शैक्षणिक माहिती विद्यापीठाकडे सापडेना

सोमय्यांची शैक्षणिक माहिती विद्यापीठाकडे सापडेना

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मुलाला विद्यापीठाने केलेल्या नोंदींप्रमाणे केवळ १४ महिन्यांत पीएच.डी.ची पदवी बहाल करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता विद्यापीठात किरीट सोमय्या यांची शैक्षणिक कागदपत्रे सापडत नसल्याची बाब समोर आली आहे. विद्यापीठाने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीत तशी कबुली दिली आहे.
विद्यापीठाकडे किरीट सोमय्या यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि त्यांच्याही पीएच.डी.संदर्भातील माहिती माहिती अधिकारात किरण फाटक यांनी विचारली होती. ती माहिती त्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना पुढील अपील करण्यासाठी विद्यापीठाने सांगितले असल्याने यावर युवासेनेने तीव्र आक्षेप घेतले आहेत.
...
चौकशीची मागणी
किरीट सोमय्या यांनी दाखल केलेली कागदपत्रे तिन्ही विभागांत सापडत नाहीत. शिवाय त्यांचे वादग्रस्त शिक्षक गाईड प्रा. विवेक देवळणकर सन २००८ मध्ये बडतर्फ होते. तसेच सन २०१२ मध्ये त्यांच्या विद्यार्थीसंख्येत कपात करण्यात आली होती, त्यामुळे ही माहिती लपवली जात आहे, असे आरोप युवासेनेने केले आहेत. तसेच या संपूर्ण प्रकाराची कसून चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे आणि शीतल शेठ देवरूखकर यांनी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांना निवेदन देऊन केली आहे.