देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच
देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच

देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : खंडणी वसुलीप्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी कारागृहातच जाणार आहे. विशेष न्यायालयाने शुक्रवारी (ता. २१) त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला. देशमुख यांच्या वतीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात येणार आहे.
विशेष सीबीआय न्यायालयाचे न्या. एस. व्ही. गवलानी यांनी शुक्रवारी देशमुख (वय ७१) यांच्या जामीन अर्जावर निकाल जाहीर केला. या प्रकरणात माफीचा साक्षीदार सचिन वाझे याने दिलेल्या जबाबाकडे दुर्लक्ष देता येणार नाही. तसेच उच्चपदावर असलेल्या व्यक्तीकडून होणाऱ्या गैरप्रकारांच्या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
देशमुख यांना ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे; मात्र सीबीआयने केलेल्या फौजदारी फिर्यादीमध्ये त्यांच्यावर खंडणीवसुलीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात जामीन मिळण्यासाठी त्यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता; मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला. दरम्यान, सीबीआयने त्यांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला आहे. भ्रष्टाचाराच्या आधाराने मिळालेल्या लाभावर कारवाई आवश्यक आहे, असा युक्तिवाद सीबीआयच्या वतीने करण्यात आला होता, तर वैद्यकीय कारणांमुळे जामीन मंजूर करण्याची मागणी देशमुख यांनी अर्जात केली होती.