ग्रामीण आरोग्य सेवेचे विस्तारीकरण करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण आरोग्य सेवेचे विस्तारीकरण करा
ग्रामीण आरोग्य सेवेचे विस्तारीकरण करा

ग्रामीण आरोग्य सेवेचे विस्तारीकरण करा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. आरोग्य व्यवस्थेचे विस्तारीकरण होण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर करावेत व त्यावर कार्यवाही करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केल्या.

मंत्रालयात आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. २०) बैठक पार पडली. या बैठकीस आमदार संजय कुटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसचिव दिलीप गावडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. साधना तायडे, संचालक नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, अवर सचिव दीपक केंद्रे आदी उपस्थित होते.
संग्रामपूर ग्रामीण आरोग्य रुग्णालयातील पदभरती, यंत्रसामग्री याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करावा. या प्रस्तावाला सरकारकडून तत्काळ मान्यता मिळेल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री सावंत यांनी दिल्या. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणी वर्धन करण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्याला शासनाकडून तत्काळ मान्यता मिळेल, यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

परभणी, धुळे येथील रुग्णालयाच्या कामाला वेग
परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयास ५० एकर जागा देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. त्यासाठी प्रस्ताव सादर करताना आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. धुळे जिल्ह्यातील साक्री येथील रुग्णालयाबाबतचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्याचे आमदार मंजुळा गावित यांनी माहिती दिली.