कृषी पर्यटन क्षेत्रासाठी अभ्यासक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी पर्यटन क्षेत्रासाठी अभ्यासक्रम
कृषी पर्यटन क्षेत्रासाठी अभ्यासक्रम

कृषी पर्यटन क्षेत्रासाठी अभ्यासक्रम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी पर्यटन संचालनालय व शासकीय तंत्रनिकेतन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. दोन्ही विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषी व ग्रामीण पर्यटन व्यवस्थापन प्रमाणपत्र’ अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

९० दिवसांचा हा अभ्यासक्रम ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच हायब्रीड मोडमध्ये शिकविला जाणार आहे. कृषी पर्यटन मालक, तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी हा कोर्स उपयुक्त ठरणार आहे. या अभ्यासक्रमाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचावी, यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम करण्यात येत आहेत. कृषी व ग्रामीण पर्यटनाचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचे व लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचता येईल, आदी बाबी या कार्यक्रमात सांगण्यात आल्या आहेत. सुरुवातीला विदर्भात अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत संपूर्ण विदर्भामध्ये ७० कृषी पर्यटन केंद्रांची नोंदणी पर्यटन संचालनालयाकडे झालेली आहे. निकट भविष्यामध्ये कृषी पर्यटनाशी निगडित व्यवसायामध्ये विदर्भात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे सांगण्यात आले.

रोजगारनिर्मितीच्या संधी
ग्रामीण कृषी पर्यटनाद्वारे लोकांना रोजगार उपलब्ध होण्यास खूप मदत होणार आहे. या क्षेत्रामध्ये प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. या कार्यक्रमामुळे कृषी पर्यटनधारकांना वाव मिळेल, तसेच गावपातळीवर तरुणांना रोजगार निर्माण होण्यास मदत मिळेल. तसेच पर्यटनामध्ये आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याकरिता हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. सोबतच शेतीला पूरक म्हणून केला जाणार व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन फायदेशीर ठरणार आहे.