आशा वर्कर आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आशा वर्कर आक्रमक
आशा वर्कर आक्रमक

आशा वर्कर आक्रमक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : राज्य शासनाने बोनस, किमान वेतन आदी दिवाळीपूर्वी घोषणा केली नाही तर महाराष्ट्रातील शेकडो आशा वर्कर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बुधवारी २६ तारखेला ओवाळणीचा कार्यक्रम करण्याकरिता दुपारी ३ वाजता जाणार आहेत. या वेळी ओवाळणीच्या स्वरूपात मानधनवाढीची भेट मागणार आहेत, असे कृती समितीचे निमंत्रक एम. ए. पाटील यांनी कळवले आहे.
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ७० हजार आशा वर्कर व चार हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत. त्यांच्या योगदानामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होते. कोरोना महामारीच्या काळामध्ये आशा स्वयंसेविकांनी कुटुंबीयांची व जीवाची पर्वा न करता जीवावर उदार होऊन काम केले. त्याबद्दल त्यांची आरोग्य आघाडीचे सैनिक म्हणून खूप वाहवा झाली. युनोनेदेखील भारत देशातील आरोग्य खात्यातील आशा वर्करच्या कामाची नोंद घेऊन त्यांच्या कामाचा गौरव केला; मात्र त्यांच्या कामाचा मोबदला कधीच वेळेवर मिळत नाही. त्यांना मिळणारा मोबदला अत्यंत कमी व किमान वेतनाच्या खाली आहे. विविध क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना दिवाळीअगोदर बोनस दिला जातो, परंतु आशा वर्करना बोनसही दिला जात नाही. असे सांगत या सर्व मागण्यांकरिता मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्या वेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा झाली होती. या मागण्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी सविस्तर चर्चा करून मागण्यांबाबत अनुकूल निर्णय दिवाळीपूर्वी घेऊ, असे त्यांनी आश्वासन दिले होते.
कृती समितीचे निमंत्रक एम. ए. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची ठाणे येथील निवासस्थानी भेट घेऊन मागण्यांबाबत सविस्तर चर्चाही केली होती. दिवाळीपूर्वी निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.