आरेमधील मेट्रो भवन हलविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरेमधील मेट्रो भवन हलविले
आरेमधील मेट्रो भवन हलविले

आरेमधील मेट्रो भवन हलविले

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) एमएमआर क्षेत्रात ३३७ किलोमीटर मेट्रो मार्ग उभारत आहे. या मार्गांचे संचालन करण्यासाठी आरे येथे प्रस्तावित असलेले मेट्रो भवन पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे अखेर दहिसर- मांडले येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. आरेतील मेट्रो भवन इतरत्र हलविण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
एमएमआरडीए प्राधिकरणाची १५३ वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आरे येथील मेट्रो भवन इतरत्र स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. आरेमध्ये मेट्रो ३ चे कारशेड आणि मेट्रो भवन उभारण्यास पर्यावरणप्रेमी विरोध करत आहेत, याची दखल घेत अखेर सरकारने आरेमधील मेट्रो भवन दहिसर येथील जागेवर करण्यास मान्यता दिली आहे. या जागेवर मेट्रोसंलग्न काम करण्यासही मान्यता मिळाली असल्याने आता आरेमधील मेट्रो भवन दहिसर येथे उभारण्यात येईल. येथे मेट्रोचे आदेश आणि नियंत्रण केंद्र असणार आहे.
एमएमआरडीए एमएमआर क्षेत्रात ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग उभारत आहे. यातील काही मेट्रो मार्गांचे काम पुढील दोन तीन वर्षांत पूर्ण होणार आहे. या मार्गांचे संचालन करण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते आरे मध्ये मेट्रो भवन उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले; मात्र पर्यावरणप्रेमींनी आरेमध्ये मेट्रो कारशेड आणि मेट्रो भवन उभारण्यास विरोध केल्याने हे काम रखडले होते. अखेर शिंदे-फडणवीस सरकारने मेट्रो भवनाचा निर्णय घेऊन मेट्रोच्या कामाला गती दिली आहे. दहिसर- मांडले येथे मेट्रो २ बच्या कारशेडजवळ मेट्रो भवनची इमारत प्रस्तावित केली आहे. जमीन अधिग्रहण करून येथील कामाला एमएमआरडीए सुरुवात करणार आहे.
...
मेट्रो भवन स्थलांतरित करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. सरकारला उशिरा का होईना, सुबुद्धी सुचली आहे. आता आरेमधील जंगलाचे संरक्षण करण्याचे काम सरकारने करायला हवे. आरेच्या जमिनीवर विकसकांचा डोळा असून हा प्रकार थांबला पाहिजे.
- स्टॅलिन डी, वनशक्ती संघटना