दिवाळी सुटीत ‘कोविड वृत्ता’ला सुट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी सुटीत ‘कोविड वृत्ता’ला सुट्टी
दिवाळी सुटीत ‘कोविड वृत्ता’ला सुट्टी

दिवाळी सुटीत ‘कोविड वृत्ता’ला सुट्टी

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ : कोविड महामारीच्या काळात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दररोज कोविडसंदर्भात प्रसिद्धिपत्रकाच्या माध्यमातून माहिती देण्यास सुरुवात झाली. २४ जानेवारी २०२० पासून सुरू झालेली ही आरोग्य विभागाची सेवा मागील तीन वर्षे अविरत सुरू आहे; मात्र आगामी चार दिवसांच्या दिवाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर ही माहिती देण्यात येणार नसल्याचे निवेदन आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटल्याप्रमाणे कोविड महामारीच्या काळानंतर प्रथमच सर्व जण उत्साहाने दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या पार्श्र्वभूमीवर २३ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत दिवाळी सुट्टी असल्याने कोविडची दैनंदिन माहिती प्रसारित होणार नाही. या कालावधीतही काही महत्त्वाची घडामोड झाल्यास तसे कळवण्यात येणार असल्याचे एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या राज्य सर्वेक्षण युनिटकडून स्पष्ट करण्यात आले आहे.