यिनच्या कलामहोत्सवाची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिनच्या कलामहोत्सवाची सांगता
यिनच्या कलामहोत्सवाची सांगता

यिनच्या कलामहोत्सवाची सांगता

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या यिन कलामहोत्सवाची मुंबईत सांगता झाली. यंदाच्या यिन कलामहोत्सवात रुईया महाविद्यालय आणि गुरू नानक खालसा महाविद्यालयाने चमक दाखवली.
मुंबई, ठाणे जिल्ह्यांतील १०० हून अधिक महाविद्यालयांतील सुमारे एक हजारहून अधिक स्पर्धकांनी या कलामहोत्सवात सहभाग नोंदवला. विविध प्रकारचे नृत्य, अभिनय आदी सादर करून आपली कलावंत म्हणून ओळख साकारली. माटुंगा येथील मणीबेन एम. पी. शहा महाविद्यालयात सकाळ माध्यम समूहाच्या यिनमार्फत व परिवर्तन संस्था आयोजित दोनदिवसीय कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवासाठी मुंबई, ठाणे आदी जिल्ह्यांतील शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या. यात मराठी, हिंदी, इंग्रजीसह दक्षिण भारतातील चित्रपटांतील गाणी, लोकगीते, भक्तिगीते, लावणी, रॅप साँग आदींवर स्पर्धकांनी सोलो डान्स, ग्रुप डान्स, रॅप सादर केले. एकपात्री प्रयोगासह संवाद नृत्य, स्टँडअप कॉमेडीचे विविध प्रकार स्पर्धकांनी सादर केले. फॅशन शोमध्ये मराठमोळ्या संस्कृतीसह देशातील विविध संस्कृतींचे स्पर्धकांनी दर्शन घडवले. मुंबईतील खालसा, एसएनडीटी, एसआयडब्ल्यूएस आदी महाविद्यालयांसह कल्याणतील बिर्ला आदी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा यात मोठा सहभाग होता.
दोन दिवसांच्या या कलामहोत्सवाला प्रामुख्याने डॉ. संजय खैरे, सूरज जाधव, सचिन यादव, अजित पाटील, मनीष साठे, वसंत पानसरे, संदीप अंगरक, श्रीनाथ म्हात्रे, आकाश खर्डे, मंदार तांडेल, नूर खान, रॅपर सोलो यांनी परीक्षक म्हणून कामकाज पाहिले. अभिषेक नेमाणे आणि प्रशांत भंडारी यांचे विशेष सहकार्य केले.
...
घोषणा होताच जल्लोष
अभिनेता अभिनय बेर्डे, दिग्दर्शक संकेत माने व राजू वाघमारे यांनी यिन कलामहोत्सव विजेते कॉलेज संघ - रुईया महाविद्यालय, गुरू नानक खालसा महाविद्यालयाची घोषणा केली. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयांच्या नावाने जल्लोष केला.
...

यिन कला महोत्सवाचे विजेते

एकल गायन स्पर्धा
प्रथम क्रमांक-ः सागर गडप्पा (बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी)
द्वितीय ः वेदान्त साळवी (एमडी कॉलेज)
तृतीय ः आकांशा पावडे (खालसा कॉलेज)
--
फोटोग्राफी
प्रथम - सिद्धांत कांबळे (चेतना कॉलेज)
द्वितीय - मोनीष रंगस्वामी (चेतना कॉलेज)
तृतीय - रुचित निजाई (वर्तक कॉलेज)
--
एकल नृत्य
प्रथम - तृप्ती पिंगळकर (रुईया कॉलेज)
द्वितीय - भूषण वसाथी (साठे कॉलेज)
तृतीय - नीलेश गवाड (डॉ. आंबेडकर कॉलेज)
--
ग्रुप डान्स
प्रथम - साठे कॉलेज
द्वितीय - एस एस टी कॉलेज
तृतीय - रुईया कॉलेज
--
काव्यवाचन
प्रथम - वैशाली सिंग (विवेकानंद कॉलेज)
द्वितीय - दीपेश पवार (चेतना कॉलेज)
तृतीय - स्वलेहा सिद्धीक (ठाकूर कॉलेज)
--
वक्तृत्व
प्रथम - सिद्धी मयेकर (रुईया कॉलेज)
द्वितीय - प्रसाद कुमार
तृतीय - दिशा खंडेलवाल (ठाकूर कॉलेज)
--
स्टँडअप कॉमेडी
प्रथम - विक्रांत आव्हाड (साठे कॉलेज)


द्वितीय - झहीद शेख (एसआयडब्ल्यूएस कॉलेज)
तृतीय - वैधेही (एसएसटी कॉलेज)
--
स्किट
प्रथम - चेतना कॉलेज
द्वितीय - कीर्ती कॉलेज
तृतीय - कीर्ती कॉलेज
--
एकपात्री अभिनय
प्रथम - समृद्धी (एम डी कॉलेज)
द्वितीय - रोहित (कीर्ती कॉलेज)
--
मूक अभिनय
प्रथम - रूपेश देशपाटे
--
कोलाज वर्क
प्रथम - मंदार परब (वर्तक कॉलेज)
द्वितीय - भूमी माळी (बिर्ला कॉलेज)
तृतीय - वैष्णवी सकपाळ (खालसा कॉलेज)
--
वादविवाद
प्रथम - ओम सावंत (बी. के. बिर्ला कॉलेज)
--
फॅशन शो
प्रथम मिस्टर यिन - जितू बागडे (डॉ. आंबेडकर कॉलेज)
द्वितीय - हर्षल वाघ (ठाकूर कॉलेज)
तृतीय - फैज खान (खालसा कॉलेज)

प्रथम मिस यिन - पूनम तुपट (डॉ. आंबेडकर कॉलेज)
द्वितीय - राजवी मोंडकर (खालसा कॉलेज)
तृतीय - द्रीशा नायर (बिर्ला कॉलेज)
--
रॅप
प्रथम - श्रवण मांडवकर (रुईया कॉलेज)
द्वितीय - कृष्णा मकवाना (खालसा कॉलेज)
तृतीय - दिहार (ठाकूर कॉलेज)
...
या कार्यक्रमाचा तरुण पिढीला नक्कीच फायदा होईल. हे यंग नेटवर्क आहे. या पिढीला भेटल्यावर एक नवीन एनर्जी मिळते. मी या पिढीतील आहे. ऊर्जा मिळते. तरुणांनी ऊर्जा चांगल्या ठिकाणी वापर केला पाहिजे. ४ नोव्हेंबरला आमचा ‘मन कस्तुरी रे’ हा चित्रपट सर्वत्र सिनेमागृहांत प्रदर्शित होत आहे.
- अभिनय बर्डे, अभिनेता
...
अशा कार्यक्रमामुळे नवोदित कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळतो. हा उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे नवीन कलाकार मिळतील, यात वाद नाही.
- संकेत माने, दिग्दर्शक
---
आयुष्य एकदाच मिळते. सर्व करून बघा. व्यसन करू नका. परिवर्तन घडवायचे आहे, अशी मनाशी खूणगाठ बांधा. आपल्या मनातील आवाज आपण ऐकणे गरजेचे आहे. कोणतीही गोष्ट अंतःकरणातून करा.
- राजू वाघमारे, अध्यक्ष, परिवर्तन