यिनच्या कलामहोत्सवाची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिनच्या कलामहोत्सवाची सांगता
यिनच्या कलामहोत्सवाची सांगता

यिनच्या कलामहोत्सवाची सांगता

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या दोन दिवसायी ‘यिन’ कलामहोत्सवाची मुंबईत दिमाखदार सांगता झाली. कलामहोत्सवात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील शंभरहून अधिक महाविद्यालयांतील सुमारे एक हजारपेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यंदाच्या यिन कलामहोत्सवात रुईया महाविद्यालय आणि गुरू नानक खालसा महाविद्यालयाने चमक दाखवली.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा कलाविष्कार कलामहोत्सवाचे वैशिष्ट्‍य ठरले. विविध प्रकारचे नृत्य, अभिनय आदी सादर करून त्यांनी आपली कलावंत म्हणून ओळख साकारली. माटुंगा येथील मणीबेन एम. पी. शहा महाविद्यालयात सकाळ माध्यम समूहाच्या यिनमार्फत व परिवर्तन संस्था आयोजित दोनदिवसीय कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात सहभागी झालेल्या मुंबई, ठाणे आदी जिल्ह्यांतील शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या. मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह दक्षिण भारतातील चित्रपटांतील गाणी, लोकगीते, भक्तिगीते, लावणी, रॅप साँग आदींवर स्पर्धकांनी सोलो आणि ग्रुप डान्स सादर केले. एकपात्री प्रयोगासह संवाद नृत्य आणि स्टॅण्डअप कॉमेडीचे विविध प्रकार स्पर्धकांनी सादर केले. फॅशन शोमध्ये मराठमोळ्या परंपरेसह देशातील विविध संस्कृतींचे स्पर्धकांनी दर्शन घडवले. मुंबईतील खालसा, एसएनडीटी, एसआयडब्ल्यूएस आणि कल्याणतील बिर्ला महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा त्यात मोठा सहभाग होता.
दोन दिवसांच्या कलामहोत्सवाला प्रामुख्याने डॉ. संजय खैरे, सूरज जाधव, सचिन यादव, अजित पाटील, मनीष साठे, वसंत पानसरे, संदीप अंगरक, श्रीनाथ म्हात्रे, आकाश खर्डे, मंदार तांडेल, नूर खान, रॅपर सोलो आदींनी परीक्षक म्हणून कामकाज पाहिले. अभिषेक नेमाणे आणि प्रशांत भंडारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
...
घोषणा होताच जल्लोष
अभिनेता अभिनय बेर्डे, दिग्दर्शक संकेत माने व राजू वाघमारे यांनी यिन कलामहोत्सव विजेते कॉलेज संघ रुईया महाविद्यालय आणि गुरू नानक खालसा महाविद्यालयाची घोषणा केली. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयांच्या नावाने जल्लोष केला.
...

यिन कला महोत्सवाचे विजेते

एकल गायन स्पर्धा
प्रथम क्रमांक ः सागर गडप्पा (बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी)
द्वितीय ः वेदान्त साळवी (एमडी महाविद्यालय)
तृतीय ः आकांशा पावडे (खालसा महाविद्यालय)
--
फोटोग्राफी
प्रथम ः सिद्धांत कांबळे (चेतना महाविद्यालय)
द्वितीय ः मोनीष रंगस्वामी (चेतना महाविद्यालय)
तृतीय ः रुचित निजाई (वर्तक महाविद्यालय)
--
एकल नृत्य
प्रथम ः तृप्ती पिंगळकर (रुईया महाविद्यालय)
द्वितीय ः भूषण वसाथी (साठे महाविद्यालय)
तृतीय ः नीलेश गवाड (डॉ. आंबेडकर महाविद्यालय)
--
ग्रुप डान्स
प्रथम ः साठे महाविद्यालय
द्वितीय ः एस एस टी महाविद्यालय
तृतीय ः रुईया महाविद्यालय
--
काव्यवाचन
प्रथम ः वैशाली सिंग (विवेकानंद महाविद्यालय)
द्वितीय ः दीपेश पवार (चेतना महाविद्यालय)
तृतीय ः स्वलेहा सिद्धीक (ठाकूर महाविद्यालय)
--
वक्तृत्व
प्रथम ः सिद्धी मयेकर (रुईया महाविद्यालय)
द्वितीय ः प्रसाद कुमार
तृतीय ः दिशा खंडेलवाल (ठाकूर महाविद्यालय)
--
स्टॅण्डअप कॉमेडी
प्रथम ः विक्रांत आव्हाड (साठे महाविद्यालय)
द्वितीय ः झहीद शेख (एसआयडब्ल्यूएस महाविद्यालय)
तृतीय ः वैधेही (एसएसटी महाविद्यालय)
--
स्किट
प्रथम ः चेतना महाविद्यालय
द्वितीय ः कीर्ती महाविद्यालय
तृतीय ः कीर्ती महाविद्यालय
--
एकपात्री अभिनय
प्रथम ः समृद्धी (एम डी महाविद्यालय)
द्वितीय ः रोहित (कीर्ती महाविद्यालय)
--
मूक अभिनय
प्रथम ः रूपेश देशपाटे
--
कोलाज वर्क
प्रथम ः मंदार परब (वर्तक महाविद्यालय)
द्वितीय ः भूमी माळी (बिर्ला महाविद्यालय)
तृतीय ः वैष्णवी सकपाळ (खालसा महाविद्यालय)
--
वादविवाद
प्रथम ः ओम सावंत (बी. के. बिर्ला महाविद्यालय)
--
फॅशन शो
प्रथम ‘मिस्टर यिन’ ः जितू बागडे (डॉ. आंबेडकर महाविद्यालय)
द्वितीय ः हर्षल वाघ (ठाकूर महाविद्यालय)
तृतीय ः फैज खान (खालसा महाविद्यालय)

प्रथम ‘मिस यिन’ ः पूनम तुपट (डॉ. आंबेडकर महाविद्यालय)
द्वितीय ः राजवी मोंडकर (खालसा महाविद्यालय)
तृतीय ः द्रिशा नायर (बिर्ला महाविद्यालय)
--
रॅप
प्रथम ः श्रवण मांडवकर (रुईया महाविद्यालय)
द्वितीय ः कृष्णा मकवाना (खालसा महाविद्यालय)
तृतीय ः दिहार (ठाकूर महाविद्यालय)
...
या कार्यक्रमाचा तरुण पिढीला नक्कीच फायदा होईल. हे यंग नेटवर्क आहे. या पिढीला भेटल्यावर एक नवीन ऊर्जा मिळते. मी या पिढीतील आहे. तरुणांनी ऊर्जेचा चांगल्या ठिकाणी वापर केला पाहिजे. ४ नोव्हेंबरला आमचा ‘मन कस्तुरी रे’ हा चित्रपट सर्वत्र सिनेमागृहांत प्रदर्शित होत आहे.
- अभिनय बर्डे, अभिनेता
...
अशा कार्यक्रमामुळे नवोदित कलाकारांना एक व्यासपीठ मिळते. हे उत्कृष्ट व्यासपीठ आहे. त्यामुळे नवीन कलाकार मिळतील यात वाद नाही.
- संकेत माने, दिग्दर्शक
---
आयुष्य एकदाच मिळते. सर्व करून बघा. व्यसन करू नका. परिवर्तन घडवायचे आहे, अशी मनाशी खूणगाठ बांधा. आपल्या मनातील आवाज आपण ऐकणे गरजेचे आहे. कोणतीही गोष्ट अंतःकरणातून करा.
- राजू वाघमारे, अध्यक्ष, परिवर्तन