फरार होणे म्हणजे गुन्ह्यात सहभागी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फरार होणे म्हणजे
गुन्ह्यात सहभागी!
फरार होणे म्हणजे गुन्ह्यात सहभागी!

फरार होणे म्हणजे गुन्ह्यात सहभागी!

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : अंगाडिया खंडणी प्रकरणातील फरारी आरोपी निलंबित पोलिस उपायुक्त (डीसीपी) सौरभ त्रिपाठीच्या फरार होण्याच्या कृतीमुळे प्रथमदर्शनी गुन्ह्यांत त्यांचा सहभाग असल्याचे आढळत आहे, असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले असून त्रिपाठीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
गुन्ह्याची नोंद झाल्यापासून अर्जदार अनेक दिवसांपासून फरारी आहेत. आयपीएस अधिकारी असल्यामुळे त्याला तपासाच्या उद्देशाने कायद्याचे आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीचे ज्ञान आहे, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. कुलकर्णी यांनी आदेशात नमूद केले आहे. एफआयआरमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख नसला, तरी या खटल्यातील त्यांचा सहभाग नाकारता येत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
पोलिस विभागात वरिष्ठ अधिकारी असल्याने तपास अधिकारी त्यांच्या अधीन आहेत. अशा परिस्थितीत पुरावे आणि साक्षीदारांशी छेडछाड होण्याची किंवा ते प्रभावित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अर्जदाराला अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणात त्यांची नेमकी भूमिका आणि सहभाग तपासणे आवश्यक असून, तपास अधिकाऱ्यांपुढे त्याची उपस्थिती आवश्यक आहे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी त्रिपाठी यांनी यानंतर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. १९ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने त्रिपाठीचा अर्ज फेटाळला होता. या निकालाची प्रत नुकतीच उपलब्ध झाली.