बलात्कार प्रकरणात व्यावसायिकाचा जामीन फेटाळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बलात्कार प्रकरणात व्यावसायिकाचा जामीन फेटाळला
बलात्कार प्रकरणात व्यावसायिकाचा जामीन फेटाळला

बलात्कार प्रकरणात व्यावसायिकाचा जामीन फेटाळला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २५ : फेसबुकवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या ४५ वर्षीय व्यावसायिकाचा जामीन मुंबई सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे.

अल्पवयीन मुलगी तिच्या वडिलांच्या मोबाईलवरून फेसबुक चेक करायची. त्या वेळी तिची आरोपीशी ओळख झाली. पुढे त्यांचे फोनवर बोलणे सुरू झाले आणि ते बाहेर भेटूही लागले. मुलीच्या जबाबात असे आढळले, की आरोपीने स्वतःचे वय २५ वर्षे सांगितले होते. तसेच आपण लग्न करू असे भासवून तो आई-वडील घरी नसताना तिच्या घरी तिला भेटायचा. याची माहिती शेजाऱ्यांनी पालकांना दिली होती. तसेच तिची तब्येतही बिघडली होती. वैद्यकीय तपासणीमध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याची गोष्ट उघड झाली.

पालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केल्यावर पोलिसांनी व्यावसायिकाला अटक केली. न्यायालयाने आरोपीचा जामीन नामंजूर केला आहे. मुलीच्या वयाचा फायदा आरोपीने घेतला आणि तिला धमकावून, फसवून तिच्याशी जवळीक साधली. अशा मनोवृत्तीच्या आरोपीला जामीन मंजूर होता कामा नये, असे निरीक्षण विशेष पोक्सो न्यायालयाने नोंदवले आहे.