ग्रीन क्रॅकरचे अंमलवजावणीत अपयश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रीन क्रॅकरचे अंमलवजावणीत अपयश
ग्रीन क्रॅकरचे अंमलवजावणीत अपयश

ग्रीन क्रॅकरचे अंमलवजावणीत अपयश

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ ः सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे कमी प्रदूषण व्हावे यासाठी ग्रीन क्रॅकर ही संकल्पना आणली गेली; मात्र प्रदूषण कमी होते असे दिसत नाही. ३० टक्के प्रदूषण कमी व्हावे असे अपेक्षित आहे. निरीने या माध्यमातून काहींना परवाने दिले. क्यूआर कोडदेखील सुरू झाले; मात्र याची फारशी अंमलबजावणी होताना दिसत नाही, अशी खंत आवाज फाऊंडेशनच्या प्रमुख सुमेरा अब्दुलली यांनी व्यक्त केली. यंदाही दिवाळीत वाजवलेल्या फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले, त्या पार्श्वभूमीवर सुमेरा अब्दुलली यांनी ही खंत व्यक्त केली.
त्या पुढे म्हणाल्या, की पूर्वीपेक्षा परिस्थिती सुधारत आहे. फटाक्यांचा आवाज कमी होतो आहे; मात्र फटाके बनवण्यासाठी जो कंटेंट वापरला जातो, त्यात फारसा बदल झालेला दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयाने फटाके बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही प्रकारच्या रासायनिक पदार्थांवर बंदी आणलेली आहे; मात्र त्यावर कुणी फारसे लक्ष दिलेले दिसत नाही. घातक पदार्थांचा वापर आजही होतो.
प्रदूषणाबाबत लोकांमध्ये जागृती झाली की नाही, हे ठामपणे सांगणे अवघड आहे. लोकांवर राजकीय लोकांचा मोठा प्रभाव असतो, पण आपल्याकडील कोणतीही राजकीय व्यक्ती या विषयावर भाष्य करण्यास तयार नसते. कुठल्याही राजकीय नेत्याने प्रदूषण न करण्याचे किंवा फटाके न फोडण्याचे आवाहन केलेले ऐकीवात नाही.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रयत्नांमुळे आवाजी प्रदूषण काहीअंशी कमी झाले; मात्र हवेचे प्रदूषण फारसे कमी झाल्याचे दिसत नाही. एमपीसीबीसोबत पोलिस, सरकार यांनीही गांभीर्याने कारवाई करणे गरजेचे आहे.
...
मुख्य समस्येकडे दुर्लक्ष!
सरकारने सर्व सण निर्बंधमुक्त आणि उत्साहात साजरे करण्याचे आवाहन केले आहे, त्याबाबत अब्दुलली म्हणाल्या, की आपल्याकडे राजकारणी केवळ दुसऱ्याकडे बोट दाखवण्यात व्यग्र आहेत. प्रदूषणासाठी दुसऱ्याला जबाबदार धरण्याची वृत्ती आहे. मुख्य समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. प्रदूषण समस्येवर परिणामकारक काम दिसत नाही; मात्र ही सर्वांची जबाबदारी असून यासाठी सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. प्रदूषण कमी करण्याबाबत आपली जबाबदारी मोठी आहे. आपण फटाके किंवा प्रदूषण होईल असे कोणतेही वर्तन टाळायला हवे. फटाके घेताना क्यूआर कोड बघायला हवा. शक्य असल्यास फटाके प्रयोगशाळेमध्ये तपासायला हवेत.
...
प्राथमिकता द्यावी लागेल!
हळूहळू लोकांमध्ये जागृती येत आहे. प्रदूषणाबाबतच्या तक्रारी वाढत आहेत. यातून दिसते, की लोक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, पण यासाठी राजकीय इच्छाशक्ती फारच महत्त्वाची आहे. प्रदूषण या विषयाला आपल्याला प्राथमिकता द्यावी लागेल.