गर्दीत पाठलाग करणे अशक्य! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गर्दीत पाठलाग करणे अशक्य!
गर्दीत पाठलाग करणे अशक्य!

गर्दीत पाठलाग करणे अशक्य!

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी आणि गर्दीच्या वेळी एखाद्या व्यक्तीचा पाठलाग करणे अशक्य आहे, असे निरीक्षण नोंदवत महानगर दंडाधिकारी न्यायालयाने ४० वर्षीय आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
चिराबाजार येथील रहिवासी असलेल्या महिलेने एका व्यावसायिकाविरोधात सन २०१७ मध्ये तक्रार केली. तो सतत माझ्याकडे बघत असतो. सलग तीन महिने संबंधित व्यावसायिक मरीन लाईन्स स्थानकापर्यंत दुचाकीवरून माझा पाठलाग करतो, असे फौजदारी तक्रारीत म्हटले होते. आरोपीच्या वतीने या आरोपांचे खंडन करण्यात आले. तक्रारदार महिलेचा गैरसमज झाला आहे आणि त्यातून त्यांनी ही तक्रार केली आहे, असा बचाव त्यांनी केला. एस्प्लानेड न्यायालयाने ही तक्रार अमान्य केली आहे. मुंबईसारख्या शहरात गर्दीच्या ठिकाणी आणि गर्दीच्या वेळेत एखाद्याचा पाठलाग करणे अशक्य आहे. पदपथावरून चालणाऱ्या व्यक्तीचा दुचाकीवरून पाठलाग कसा होऊ शकतो, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. हा प्रकार गैरसमजुतीमध्ये झाला असावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले आणि तक्रार रद्दबातल केली. पोलिसांनी भादंवि कलम ३५४ ड नुसार पाठलाग करणे, असा आरोप ठेवला होता. न्यायालयाने त्याला दोषमुक्त केले आहे.