विद्युत सहायकांच्या कागदपत्रांची पडताळणी २९ व ३० ऑक्टोबरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्युत सहायकांच्या कागदपत्रांची  
पडताळणी २९ व ३० ऑक्टोबरला
विद्युत सहायकांच्या कागदपत्रांची पडताळणी २९ व ३० ऑक्टोबरला

विद्युत सहायकांच्या कागदपत्रांची पडताळणी २९ व ३० ऑक्टोबरला

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : महावितरणमार्फत राबवण्यात आलेल्या विद्युत सहायक पदाच्या भरती प्रक्रियेत पात्र ठरलेले उमेदवार अनेक दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्याबाबत उमेदवारांनी अनेक आंदोलने केली. अखेर या आंदोलनाची दखल घेत महावितरणने निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे. या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी २९ आणि ३० ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. कागदपत्रे पडताळणीसाठी गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल, असे महावितरणने स्पष्ट केले.
महावितरणमध्ये विद्युत सहायक या संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी तीन वर्षांच्या निश्चित कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने उमेदवारांची निवड करण्यासाठी एप्रिल व जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. भरती प्रक्रिया न्यायालयात गेल्याने पुढे त्याचा खोळंबा झाला. सर्व प्रकरणांचा एकत्रित निकाल न्यायालयाने दिल्यानंतर भरती प्रक्रिया जलद गतीने पार पडेल, अशी आशा उमेदवारांना होती; मात्र नियुक्ती देण्यात येत नसल्याने उमेदवारांनी आंदोलने केली. अखेर महावितरणने न्यायालयाच्या आदेशानुसार नव्याने निवड झालेल्या आणि प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी परिमंडलनिहाय २९ व ३० ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरिता हजर राहणार नाहीत, अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.