उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे शिष्यवृत्तीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे शिष्यवृत्तीची मागणी
उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे शिष्यवृत्तीची मागणी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे शिष्यवृत्तीची मागणी

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ ः राज्यात विविध पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची मागील वर्षातील शिष्यवृत्ती रखडली आहे. त्याविषयी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. तसेच इतर अनेक प्रश्नांचे निवेदन त्यांनी या वेळी मंत्र्यांना सादर केले.

राज्यात शैक्षणिक वर्ष २०१७ पासूनच्या अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडलेली आहे. २०२१-२२ मधील २४ लाख ८३ हजार ४८३ प्राप्त अर्जांपैकी १९ लाख ९७ हजार २३२ अर्जांची पडताळणी झाली आहे. त्यातून आतापर्यंत केवळ ११ लाख ९७ हजार २३ विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असून या विद्यार्थ्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तात्काळ शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री प्रेरणा पवार, कोकण प्रदेश मंत्री अमित ढोमसे, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री रोहित राऊत, मुंबई महानगर मंत्री ओमकार मांढरे, विभाग संयोजक निधी गाला, निशा भारती हे उपस्थित होते.