मुंबईत छठपुजेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत छठपुजेचे आयोजन
मुंबईत छठपुजेचे आयोजन

मुंबईत छठपुजेचे आयोजन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : संजय निरुपम आणि बिहारी फ्रंटच्या वतीने छठ पूजा २०२२ चे आयोजन मुंबईतील जुहू चौपाटी, हॉटेल पामग्रोव्हच्या मागे करण्यात आले आहे. ही छठपूजा रविवारी (ता. ३०) सायंकाळी ४ ते १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. हे छठ पूजेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.

याबद्दल छठ पूजेचे आयोजक संजय निरुपम म्हणाले, की मुंबईमध्येत राहणाऱ्या उत्तर भारतीयांसाठी छठ पूजा हे एक महापर्व असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही बिहारी फ्रंटच्या वतीने छठ पूजा २०२२ या पर्वाचे आयोजन आम्ही जुहू चौपाटी येथे केलेले आहे. श्रद्धा आणि भक्तीच्या या अनंतयात्रेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या महापर्वामध्ये सहभागी होणाऱ्या छठव्रतीयांसाठी सर्व सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच भोजपुरी आणि मैथिली भाषेतील भजन व कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. मी स्वतः व माझे सहयोगी बांधव अर्घ्य अर्पण करणार आहोत. जास्तीत जास्त लोकांनी आमच्याबरोबर या महापर्वामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच सुप्रसिद्ध गायिका चंदन तिवारी आणि गायिका प्रिया मल्लिक यांच्या सांस्कृतिक, गीत आणि भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.