राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेच्या
नावनोंदणीसाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत
राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत

राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी हा कला उत्सव आयोजित करण्यात आला आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे हा उत्सव झाला नव्हता; मात्र यावेळी राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी करण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी फेसबुक, इन्स्टाग्राम अथवा यू-ट्युबवर स्वतःचा कला सादरीकरण करतानाचा व्हिडीओ #kalautsavmah2022 या हॅशटॅग अंतर्गत पोस्ट करावा आणि त्याची लिंक https://scertmaha.ac.in/kalautsav या पोर्टलवर आवश्यक माहिती भरून पोस्ट करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.